गुरुपौर्णिमा संपूर्ण माहिती 2025 Guru Purnima Complete Information 2025
गुरुपौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक पवित्र सण आहे जो गुरूंच्या महत्वाचे स्मरण करून त्यांना आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो हा दिवस आषाढी महिन्यातील पौर्णिमेला पूर्ण चंद्राच्या दिवशी साजरा केला जातो.
गुरुपौर्णिमा हा फक्त एक सण नसून कृतज्ञतेचा उत्सव आहे. आपले जीवन घडवण्यासाठी मेहनत करणाऱ्या गुरुजनांप्रती आपली आदरांजली अर्पण करण्याचा हा पवित्र दिवस आहे.
गुरुपौर्णिमेच्या ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व
१.वेद व्यास जयंती -
या दिवशी महर्षी वेद व्यासांचा जन्म झाला होता त्यांनी वेदांचे विभागीकरण करून त्यांचे ज्ञान मानव जा तिकडे पोहोचले म्हणून त्यांना आदिगुरू मानले जाते.
२.गुरू-शिष्य परंपरा- भारतात गुरू शिष्य परंपरा खूप जुनी आणि पवित्र आहे. गुरू शिष्याला केवळ ज्ञान देत नाही तर त्याचा मार्गदर्शक , स्नेही आणि प्रेरणास्त्रोतही असतो.
३.बौद्ध परंपराः गौतम बुद्धांनी बोध गयेत ज्ञान प्राप्तीनंतर प्रथम उपदेश याच दिवशी दिला होता. म्हणून बौद्ध धर्माची गुरुपौर्णिमेला विशेष स्थान आहे.
गुरु पौर्णिमेची परंपरा आणि पूजा विधी
१. गुरुचे पूजन: गुरु किंवा अध्यापक यांचे पाय दिसले जातात त्यांना खूप हार अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात.
२. ध्यान व साधना: अनेक साधक या दिवशी ध्यान जप आणि आत्म परीक्षण करतात.
३. सत्संग प्रवचन: विविध मतांमध्ये आश्रमांमध्ये गुरूंच्या महिमेचे प्रवचन, कीर्तन ,सत्संग घेतले जातात.
आजच्या काळातील गुरुपौर्णिमा
आजच्या काळातील गुरुपौर्णिमा शाळा महाविद्यालय व प्रशिक्षण संस्थांमध्ये शिक्षकांचा सन्मान करण्याचा दिवस म्हणून साजरा होते.
विविध क्षेत्रातील मार्गदर्शक व्यक्ती यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.
गुरुचा महिमा श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु :गुरुर्देवो महेश्वरा:|
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः||
या श्लोकात गुरुला ब्रह्मा सर्जक, विष्णू पालक आणि महेश संहारकर्ता समजले आहे. कारण गुरु हे सर्व प्रकारचे अज्ञान नष्ट करून ज्ञानाचा प्रकाश देतात.