निरोप समारंभ मनोगत भाषण शायरी चारोळ्या कविता pdf मराठी हिंदी इंग्रजी | Farewell Ceremony Emotional Speech Shayari Charolya Poems pdf Marathi Hindi Eng
आज आपण सर्वजण इथे ( २०२५ -२६ किंवा शाळेचे नाव )बॅचला निरोप देण्यासाठी जमलो आहोत सोबत घालवलेले ते हास्य विनोदाचे क्षण एकत्र केलेली कामे आणि एकमेकांना दिलेली साथ हा सर्व प्रवास आज डोळ्यासमोर एखाद्या चित्रपटासारखा फिरताना दिसत आहे.
![]() |
| निरोप समारंभ भाषण |
निरोप समारंभ (toc)
निरोप समारंभ मनोगत
“प्रवास हा सुरू झाला होता एका छोट्या पाऊलाने,
आज वळण आले आहे पण मन भरले आहे समाधानाने,
काही क्षण सुटतील, काही माणसे दुरावतील,
पण तुमची साथ आणि आठवण मनात कायम राहतील.”
आज जेव्हा मी या हॉलमध्ये प्रवेश केला, तेव्हा मला तो पहिला दिवस आठवला जेव्हा मी इथे नवीन होतो/होते. तो दिवस आणि आजचा दिवस... यात खूप काही बदल नाही फक्त बदलल्या नाहीत त्या इथे मिळालेल्या आठवणी आणि तुम्ही दिलेली सोबत...
मनोगत पहिल्या दिवसाच्या आठवण - मनोगत
" पावले अडखळतात निरोप घेताना,
डोळे पाणवतात दूर जाताना,
मैत्री आणि प्रेमाचे हे नाते असेच राहू दे,
आठवणींचा सुगंध मनाच्या कोपऱ्यात कायम राहू दे."
शाळेतील आठवणींचा प्रवास मनोगत
या वास्तुत आपण फक्त विषय शिकलो नाही, तर आयुष्य जगायला शिकलो. त्या वर्गातील मागच्या बाकावरच्या गप्पा, मधल्या सुट्टीत एकत्र खाल्लेले डबे, परीक्षेच्या वेळी झालेली धाकधूक, पेटीच्या तासाला केलेली मस्ती, 26 जानेवारी 15 ऑगस्ट व इतर दिवशी केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आठवणी आणि जाता जाता वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये केलेले फनी डान्स.. आणि शिक्षकांचा तो मायेचा ओरडा.. हे सगळं आता फक्त आठवणींच्या कप्प्यात कायमस्वरूपी राहणार आहे.”
“निरोप देताना आज मन भरून आले आहे,
सोबत घालवलेले क्षण आठवणीत साठले आहेत,
प्रवास हा संपत नाही, फक्त वळण बदलत आहे,
नव्या क्षितिजाकडे जाताना, जुना आधार सुटत आहे.”
शिक्षकांबद्दल कृतज्ञता मनोगत
"आमच्या गुरुजनांनी आम्हाला केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर आमचे व्यक्तिमत्व घडवले. आम्हाला आमच्या चुकांमधून सावरले. तुम्ही दिलेली शिदोरी आम्हाला भविष्यातील प्रत्येक संकटाशी लढायला ताकद देईल. तुमच्या ऋणातून मुक्त होणे कधी शक्य नाही.”
मित्रांसाठी
“मित्रांनो , उद्यापासून आपले रस्ते वेगळे होतील, आपली शहरे बदलतील. कदाचित आपण रोज बोलणार नाही, पण या कॉलेजच्या कट्ट्यावर किंवा शाळेच्या बाहेर आपण जे आयुष्य जगलो, ते कोणीच हिरावून घेऊ शकणार नाही. आपण कुठेही गेलो तरी हे नाते असंच जपून ठेवूया.”
समारोप (शेवट)
जाता जाता इतकेच म्हणेन...
“निरोप घेतो आता, डोळे भरून येतात,
काही क्षण आनंदाचे, मनात घर करतात..
पुन्हा भेटू न भेटू, हा भाग निराळा,
पण कायम आठवणीत राहील ,हा आमचा शाळा/कॉलेजचा लळा!”
“ माझ्याकडून कळत नकळत कोणाचे मन दुखावले गेले असेल, तर मोठ्या मनाने मला माफ करा तुम्हा सर्वांना उज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद!”
निरोप समारंभ गाणे,गीत -
शाळेतील मित्र व मैत्रिणीसाठी गाणी..
१.ये दोस्ती हम नहीं तोंडेगे.
२.तेरे जैसे यार
३. यारो दोस्ती बडी ही हसीन हैं.

