शिक्षक दिन कविता 2025 Teachers day poem 2025
नमस्कार शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो आजचा दिवस आहे अत्यंत पवित्र कारण आज आपण साजरा करतो आहे शिक्षक दिन - ज्ञानदेवतेच्या उपासनेचा दिवस. शिक्षक दिनी आपण शिक्षक गुरुजन यांचे यांचे कार्य आपण सुंदर कवितेतून व्यक्त करणार आहोत. शिक्षक दिनी प्रस्तुत करण्यासाठी काही खास कविता आपण पाहणार आहोत.
![]() |
शिक्षक दिन कविता २०२५ |
शिक्षक दिन कविता 2025 Teachers day poem 2025
💐🌷शिक्षक दिन कविता.१ 🌷 💐
ज्ञानाचा दिप पेठवणारे,
अंधारातून वाट दाखवणारे ,
आमच्या आयुष्याचे खरे शिल्पकार,
ते म्हणजे आमचे शिक्षक आधार|
आई - वडिलांनंतर जे घडवतात,
स्वप्नांना पंख लावून उडवतात,
संस्कार, शहाणपण, आदर्श देतात,
खऱ्या अर्थाने जीवन शिकवतात|
तुमच्यामुळे आम्ही काही झालो,
तुमच्या मुळे यशाच्या शिखराला स्पर्श केला,
तुमच्या ऋणातून मुक्त होणे शक्य नाही,
कारण तुम्ही दिलेले धडे विसरणे कधी शक्य नाही|
पुस्तकातील अक्षर अर्थ मिळवून दिला,
ज्ञानासोबत माणुसकीच प्रकाश दिला,
तुमच्यामुळे उजळली आमची वाट,
तुमच्यामुळे सुंदर झाली जीवन वाट|
या दिवशी आम्ही वंदन करतो,
मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो,
तुमचे आशीर्वाद सदैव आमच्या वर राहो,
तुमच्यामुळे आमचे जीवन सुगंधित होवो |
शिक्षक दिन कविता 2025 Teachers day poem 2025
🌷💐 शिक्षक दिन कविता.२ 🌷💐
ज्ञानदीप जे प्रज्वलित केले,
अंध:कारातून आम्हा नेले |
जीवनाचे धडे शिकवतात,
खरच देव आम्हा भेटले||
पाठीवरती अक्षर उमटते,
मनामध्ये संस्कार फुलते|
श्रम, संयम, साधना ज्यांची,
ते आमुचे जीवन गुरू ठरते||
कधी आई सारखी माया,
कधी वडिलांसारखा आधार|
शिक्षकांमुळे घडते जीवन,
ज्ञानरूपी असतो त्यांचा वारसा अपार||
स्वप्नांना देतात उंच भरारी,
धैर्य शिकवतात संकटावेळी|
मनामध्ये श्रद्धा, कर्तुत्व जागे ,
शिक्षक हेच प्रेरणेचे दीपक खरे ||
आजचा या पवित्र दिवशी ,
करतो तुमच्या चरणी वंदना |
आयुष्यभर राहो उजळलेला,
शिक्षकांप्रती आमच्या कृतज्ञ भाव अमर्याद||
लहान मुलांसाठी सोपी शिक्षक दिन कविता
शिक्षकांचे देव समान,
ते करतात ज्ञानदान|
आई-वडिलांची माया देतात,
सुंदर जीवन घडवितात ||
गोड शब्दात शिकवितात,
कठीण धडे सोपे करतात|
आदर प्रेम संस्कार देतात
शिक्षकांमुळे आम्ही घडतो||
🌷 औपचारिक भाषणासाठी कविता 🌷
ज्ञानदीप ते प्रज्वलित करतात,
अंध:कारातून प्रकाश देतात|
कर्तव्य, मूल्ये, संस्कार शिकवतात ,
म्हणूनच शिक्षकच खऱ्या युगाचे निर्माता असतात||
कधी गुरू, कधी मित्र, कधी आई - वडील,
त्यांच्या ऋणांचे मोज माप करता येत नाही जगात
म्हणून शिक्षक दिनी करतो आपण वंदन,
या ज्ञान यज्ञातील महान यजमान||