Type Here to Get Search Results !

शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा मराठी व्याकरण | shabdsamuha badal ek shabd | Write a word about the phrase Marathi Grammer

 शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा मराठी व्याकरण | shabdsamuha badal ek shabd | Write a word about the phrase Marathi Grammer


१) जादूचे खेळ करून दाखवणारा - जादूगार

२) बांगड्या विकण्याचा धंदा करणारा - कासार

३) शिकवलेल्या गोष्टीचा पुन्हा पुन्हा सराव करणे - उजळणी


४) पुष्कळ वेळ पुष्कळ गोष्टी विसारणारा - विसरभोळा


५) चाळीत खूप माणसे आजूबाजूला वर खाली राहतात

       -   बिऱ्हाडे 

६) ज्याला आई वडील नाहीत तो - अनाथ


(७) खूप वर्षापासून लेखकांनी लिहून ठेवलेले लिखाण - साहित्य 

८) समाजाची निरपेक्ष सेवा करणारा - समाजसेवक


९) प्रश्नांची उत्तरे अचूक व ताबडतोब देणारा - हजरजबाबी


१०) जो अत्यंत कमी बोलतो असा -  मितभाषी


११) भिक्षा मागणारा -  भिक्षेकरी 


१२) कविता लिहिणारा - कवी


१३) लेखन करणारा - लेखक


१४) क्रिकेट खेळाच्या संघातील प्रमुख पद ज्याच्याकडे असते तो - कर्णधार संघनायक


१५) माकडाचा खेळ करणारा -  मदारी


१६) ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लागतात असा - आजानुबाहु


१७) जुन्या मातांना चिटकून राहणारा - पुराणमतवादी


१८) जे साध्य होणार नाही ते - असाध्य


१९) निसर्गत सुंदर असणारे - निसर्गसुंदर


२०) चांगला विचार -  सुविचार


२१) नवीन मतांचा पुरस्कार करणारा - नवमतवादी 


२२) पूर्वी कधीही घडले नाही असे - अपूर्व


(२३) दुसऱ्यावर अवलंबून असलेला -  परावलंबी 


२४) दर तीन महिन्यातून प्रसिद्ध होणारे - त्रैमासिक 


(२५) जंगलात लागलेली आग -  वणवा


२६) केलेले उपकार जाणणारा - कृतज्ञ


२७) केलेले उपकार न जाणणारा -  कृतघ्न



२८) इच्छिलेली वस्तू देणारी गाय कामधेनू 


२९) इच्छिलेली वस्तू देणारे झाड - कल्पवृक्ष


३०) चार रस्ते एकत्र येतात ती जागा - चौक / चव्हाटा


३१) देव नाही असे मानणारा -  नास्तिक


३२)देव आहे असे मानणारा -  आस्तिक 


३३) मोफत पाणी मिळण्याची सोय -  पाणपोई


३४) महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे - मासिक


 ३५) तिथी वार, न ठरवता आलेला -  अतिथी, आगंतुक


३६) दोन नद्या एकत्र मिळण्याची जागा  - संगम 


३७) शत्रूला सामील झालेला -  घरभेदी


३८) श्रम न करता खाणारा - ऐताबा / ऐतखाऊ 


३९) मत देणारा -  मतदार


४०) भाषण ऐकणारा -  श्रोता


४१) सदा सुख देणारा - सुखदाता


४२) उंचावरून पडणारा पाणलोट - धबधबा


४३) पावसाचे पाणी पिऊन जगणारा पक्षी - चातक 


४४) पाहण्यासाठी जमलेले लोक - प्रेक्षक


४५) कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला - कर्जबाजारी 


४६) सप्ताहातून एक वेळ प्रसिद्ध होणारे - साप्ताहिक 


४७) गावातील एकत्र पाणी भरण्याची जागा पाणवठा


४८) तीनरस्ते एकवटतात ती जागा -  तिठा


 ४९) जाणून घेण्याची इच्छा असणारा  - जिज्ञासू


५०) स्वत:शीच केलेले भाषण -  स्वगत

शब्दसमूहाबद्दल एक शब्द अधिक अभ्यासासाठी व सराव साठी  खालील  pdf Download करा.


सराव पेपर : १. 

प्रश्न.खालील कृती सोडवा.
पुढील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

१)पाणी मिळण्याची सोय - -------

२) महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे - --------

३)तिथी वार, न ठरवता आलेला -  --------

४) दोन नद्या एकत्र मिळण्याची जागा  - --------

५)  शत्रूला सामील झालेला -  ---------

६) श्रम न करता खाणारा - -------

७)  मत देणारा -  ------

८) भाषण ऐकणारा -  -----

९) सदा सुख देणारा - -------

१०) उंचावरून पडणारा पाणलोट - --------


:शब्दसमूहासाठी एक शब्द  सराव पेपर : २.




Post a Comment

2 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad