वाक्य प्रकार व वाक्य रूपांतर | vakya prakar v vakya rupantra Sentence type and sentence conversion
वाक्य प्रकार
१) विधानार्थी वाक्य.
२) प्रश्नार्थी वाक्य.
३) आज्ञार्थी वाक्य .
४) उद् गारार्थी वाक्य .
* वाक्य प्रकार ओळखा *
पुढील वाक्यांचे वाक्य प्रकार ओळखा:
१) मुलांनो ,रांगेत चला ----- आज्ञार्थी वाक्य
२) तुझी शाळा कुठे आहे ? ----- प्रश्नार्थी वाक्य
३) किती मोठी आहे तुझी शाळा ! ----- उद् गारार्थी वाक्य
४) माझी शाळा घराजवळ आहे. ------ विधानार्थी वाक्य
५) दररोज शाळेत जा . ------ आज्ञार्थी वाक्य
६) किती सुंदर ताजमहाल हा ! ----- उद् गारार्थी वाक्य
७) शिस्तीने वागावे. ------ विधानार्थी वाक्य
८) आमची परिस्थिती प्रतिकूल होती. ---- विधानार्थी वाक्य
९) आत जाण्याचे सर्व मार्ग बंद होते.------ विधानार्थी वाक्य
१०) तुझ्या भेटीने खूप आनंद झाला. ---- विधानार्थी वाक्य
११) किती सुंदर आहे हा गुलाब ! ----- उद् गारार्थी वाक्य
१२) शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी खूप काही केले.
वाक्य प्रकार : विधानार्थी वाक्य
१३) ते काम खूप मोठे आहे.
वाक्य प्रकार : विधानार्थी वाक्य
ब्लू bule रंग पर click करो।⬇️ exam दो ⬇️
https://forms.gle/a6NDryqTkH12QCDP8
सराव पेपर :१.
प्रश्न. पुढील कृती सोडवा.
पुढील वाक्यांचे प्रकार ओळखा.
१) मुलांनो रांगेत चला .
२) तुला पेढा आवडतो का ?
३) माझ्या घराजवळ झाड आहे .
४) अरेरे ! पायाला किती लागले तुझ्या !
५) शाब्बास ! छान काम केलेस तू !
६) शिस्तीने वागा .
७) तुझी शाळा कुठे आहे ?
८) दररोज शाळेत जावे.
९) ते काम खूप मोठे आहे.
१०) किती सुंदर आहे हा गुलाब !
अधिक सराव साठी वाक्य प्रकार ची खालील pdf download करा.
वाक्य प्रकार Download ( Download)
: वाक्य रूपांतर :
१) प्रवासात भरभरून बोलावे. (आज्ञार्थी करा.)
उत्तर : प्रवासात भरभरून बोला.
२)पांढरा रंग कोणाला आवडत नाही? (उद्गारार्थी करा.)
उत्तर : ओहो! किती आवडतो पांढरा रंग सगळ्यांना!
३) सर्वांनी रांगेत उभे राहा. (विधानार्थी करा.)
उत्तर : सर्वांनी रांगेत उभे राहावे
४)ताई उंच आहे. (नकारार्थी करा.)
उत्तर : ताई बुटकी नाही.
५) किती सुंदर आहे तो देखावा! (विधानार्थी करा.)
उत्तर : तो देखावा खूप सुंदर आहे.
६) ताजमहाल खूप सुंदर आहे. (उद्गारार्थी करा.)
उत्तर : किती सुंदर आहे ताजमहाल !
७) शिस्तीने वागावे. (आज्ञार्थी करा.)
उत्तर : शिस्तीने वागा.
८)माझी शाळा घराजवळ आहे. (प्रश्नार्थी करा.)
उत्तर : तुझी शाळा घराजवळ आहे का?
९) पुढील वाक्ये होकारार्थी करा :
(i) भारतीय सेना युद्धात पराभूत झाली नाही.
उत्तर: भारतीय सेना युद्धात विजयी झाली.
(ii) आई रात्रभर झोपली नाही.
उत्तर : आई रात्रभर जागी होती.
१०) पुढील वाक्ये नकारार्थी करा :
(1) कुणाचेही भले करावे.
उत्तर : कुणाचेही वाईट करू नये.
(ii) हे काम खूप मोठे आहे.
उत्तर : काम इतके लहान नाही.
सराव पेपर :२.
प्रश्न : पुढील कृती सोडवा :
(१) पुढील वाक्ये कंसांतील सूचनांप्रमाणे बदला :
१) किती सुंदर आहे ताजमहाल! (विधानार्थी करा.)
२) शिस्तीने वागावे. (आज्ञार्थी करा.)
३) माझी शाळा घराजवळ आहे. (प्रश्नार्थी करा.)
४) तो देखावा खूप सुंदर आहे. (उद्गारार्थी करा.)
५) आज गाडीत प्रचंड गर्दी आहे.(उद्गारार्थी करा.)
६) हा हत्ती अगडबंब आहे.(उद्गारार्थी करा.)
७) भारतीय सेना युद्धात पराभूत झाली नाही.( होकारार्थी करा)
८)आई रात्रभर झोपली नाही.(होकारार्थी करा)
९) कुणाचेही भले करावे.(नकारार्थी करा)
१०) हे काम खूप मोठे आहे.(नकारार्थी करा)
अधिक सराव साठी वाक्य रूपांतर ची खालील pdf download करा.
: वाक्य प्रकार व रुपांतर सराव पेपर :