Type Here to Get Search Results !

वसंत पंचमी श्रीपंचमी 2023 संपूर्ण मराठी हिंदी इंग्लिश माहिती | Vasant Panchami shripanchami 2023 Full Marathi Information

 वसंत पंचमी श्रीपंचमी 2023 संपूर्ण मराठी माहिती | Vasant Panchami shripanchami 2023 Full Marathi Hindi English Information   

नमस्कार आज आपण वसंत पंचमी 2023 संपूर्ण माहिती मराठी हिंदी इंग्लिश पाहणार आहोत. Vasant Panchami 2023 Full Marathi Information .

वसंत पंचमी श्रीपंचमी 


वसंत पंचमी(toc)

वसंत पंचमी म्हणजे काय ? 

माघ शुद्ध पंचमीला 'वसंत पंचमी म्हणतात. या तिथीपासून वसंतोत्सवाला प्रारंभ होतो. वास्तविक चैत्र वैशाल हा वसंत ऋतूचा काल मानलेला असला तरी, मकरसंक्रमणा पासून उत्तरायण सुरू झालेले असल्यामुळे माघ मासात वसंतागमनाची लक्षणे दिसू लागतात. सृष्टीत नवचैतन्य सळसळू लागलेले असते. मानवाच्या मनात उल्हास दिसू लागतो. म्हणून माघ शुद्ध पंचमीला वसंतारंभाची तिथी म्हणतात.

वसंत पंचमी 2023 संपूर्ण मराठी माहिती

भगवान श्रीकृष्णांनी गीतेत ' ऋतूनां कुसुमाकर: ' असे ज्याचे वर्णन केले आहे, त्या ऋतूराज वसंताच्या आगमनाने सारी सृष्टी आनंदाने पुलकीत होते. चैतन्याने सळसळते. सृष्टीतील वृक्ष फलद्रूप होतात, सृष्टीला नवयौवन व मातृत्व प्राप्त होते. वसंत पंचमीला नवान्नेष्टा करण्याची प्रथाही काही ठिकाणी आहे. त्यासाठी नवीन पिकांच्या लोंब्या आणून त्या घरातील देवतेला अर्पण करतात. त्यानंतर नवान्न भक्षण करतात.

या तिथीला सरस्वतीदेवी उत्पन्न झाली म्हणून तिची पूजा करतात. हा लक्ष्मीचाही जन्म-दिवस मानला जातो. म्हणून या तिथीला श्रीपंचमी म्हणतात. विष्णू व लक्ष्मी यांची विविध उपचारांनी पूजा करून हा दिवस साजरा करतात.

Vasant Panchami 2023 Full Marathi Hindi English Information   

कामदेव मदनाचा जन्म याच दिवशी झाला. म्हणून पूर्वी या दिवशी मदन रतीची पूजा करण्याची प्रथा होती. दांपत्य जीवन सुखाचे जावे, यासाठी लोक रती-मदनाची पूजा व प्रार्थना करीत. ब्रज मंडलात व राजस्थानात सर्व लोक आनंदाने व उत्साहाने हा सण साजरा करतात. काही स्त्रिया व्रतही करतात.

वसंत पंचमीचा उत्सव आजमितीस हिंदू लोकांत रूढ आहे. तसा तो पूर्वकाली रोम देशात होता.

श्रीपंचमी

रोमन हा वसंतारंभाचा दिवस असल्याचे दाखविले आहे. वसंत ऋतू हा रति व मदन यांचा ऋतू आहे, अशी एक धारणा आहे. परंतु, त्यांची देवालये नसल्यामुळे लक्ष्मी व विष्णू यांची या दिवसात पूजा केली जाते. शाई, दौत, लेखण्या, ग्रंथ, श्री सरस्वती पूजनाची याच दिवसाला मान्यता प्राप्त झाल्यामुळे याला श्रीपंचमी' असे मानून बंगाली लोक या दिवशी सरस्वतीच्या प्रतिमेची यथासांग पूजा करतात. पूजेच्या

दिवशी गणपती विसर्जनाच्या समारंभाप्रमाणे भाविक मंडळी शारदादेवीच्या मूर्तीस मोठ्या थाटाने

मिरवत जलाशयात विसर्जित करतात.. वसंताचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे. आनंदाचा कल्लोळ व भाव-भावनांचा जल्लोष साजरा करणारा आहे. अनुपम, सुंदर भासणारा, लावण्याचे दर्शन घडविणारा, चराचरात चैतन्य निर्माण करणारा निसर्ग या ऋतूत सोळा कलांनी फुलून बहरून येतो. चराचरातील वातावरण सुंदर आणि मनोहारी करणाऱ्या वसंत ऋतूचे आनंदाने स्वागत करावे, याच हर्षभरित भावनेने वसंत पंचमी साजरी करतात.

निसर्गाचे लावण्य, सुंदरता आणि मानवाची रसिकता यांचा समन्वय भावमीलन व सुरेख संगम म्हणजे

वसंत ऋतू होय. सृष्टीतील नवचैतन्य व नवनिर्माण यामुळे झालेला आनंद प्रकट करणे व मौज करणे

हाच या सणाचा खरा उद्देश आहे.

वसंताचा उत्सव हा अमर आशावादाचे प्रतीक आहे. शिशिर ऋतूत वृक्षाची पाने गळून पडतात, पण तो जीवनातून निराशा झटकून टाकतो, निराशेने घेरलेल्या जीवनाला वसंत आशेचा संदेश देतो. निराशेच्या वातावरणात तो आशेचा किरण पसरवितो. पावसाशिवाय सृष्टीला पुन्हा पल्लवित करण्याचा, सृष्टीच्या निर्मात्याचा चमत्कार वसंतात साकार झालेला आपल्याला दिसून येतो. या चमत्काराचे साक्षात घडलेले दर्शन आपले जीवन अधिकच विलोभनीय करून टाकते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad