Type Here to Get Search Results !

एस. एस. सी. मार्च 2023 24 हॉल तिकीट डाउनलोड कसे करावे | How to Download Ssc March 2023 24th Hall Ticket

 एस. एस. सी. मार्च 2023 24 हॉल तिकीट डाउनलोड कसे करावे | How to Download Ssc  March 2023 24th Hall Ticket 

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ssc मार्च 2023 24 परीक्षा जवळ आली आहे. या परीक्षेसाठी लागणारे हॉल तिकीट ssc बोर्डाच्या संकेतस्थळा वर उपलब्ध झाले आहे . एस. एस. सी. मार्च 2023 24 हॉल तिकीट डाउनलोड कसे करावे How to Download Ssc  March 2023 24th Hall Ticket कसे करावे या विषयी माहिती आज आपण पाहणार आहोत.

Ssc hall ticket 2023 24 (toc)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक आदींना सूचित करण्यात येते की, माध्यमिक शालान्त (इ. १० वी) प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ साठी सर्व विभागीय मंडळातील विद्याथ्र्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
एस. एस. सी. मार्च 2023 24 हॉल तिकीट डाउनलोड कसे करावे | How to Download Ssc  March 2023 24th Hall Ticket |
Ssc hall ticket 2023



सर्व माध्यमिक शाळांना मार्च २०२३ च्या माध्यमिक शालान्त (इ. १० वी) प्रमाणपत्र परीक्षेची प्रवेशपत्रे (Hall Ticket ) ऑनलाईन (Online) पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर सोमवार दि. ६ फेब्रुवारी, २०२३ रोजी दुपारी ३.०० वाजल्यापासून school login मध्ये download करण्याकरिता उपलब्ध होतील. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

ऑनलाईन प्रवेशपत्रे (Hall Ticket ) उपलब्ध करून घेण्याच्या अनुषंगाने सूचित करण्यात येते की,

मार्च २०२३ मधील इ. १० वी परीक्षेसाठीसाठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांनी इ. १० वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत.

१. प्रवेशपत्र (Hall Ticket ) ऑनलाईन (Online) पध्दतीने प्रिंट करून देताना विद्यार्थ्याकडून त्यासाठीकोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. 
२. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी.

३.प्रवेशपत्रामध्ये (Hall Ticket ) विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या विभागीय मंडळात जाऊन करून घ्यावयाच्या आहेत. दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी 
४. प्रवेशपत्रावरील (Hall Ticket) फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख व जन्मस्थळ या संदर्भातील दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर करून त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवावयाचीआहे. 

५.प्रवेशपत्र विद्यार्थ्याकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुनःश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत (Duplicate) असा शेरा देऊन विद्याथ्र्यांस प्रवेशपत्र द्यावयाचे आहे.

६. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे.
७. मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणा-या माध्यमिक शालान्त (इ.१० वी ) प्रमाणपत्र परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक तसेच सर्व माध्यमिक शाळा यांनी उपरोक्त बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करावी.

सर्व माध्यमिक शाळांना मार्च २०२३ च्या माध्यमिक शालान्त (इ. १० वी) प्रमाणपत्र परीक्षेची प्रवेशपत्रे (Hall Ticket ) ऑनलाईन (Online) पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर सोमवार दि. ६ फेब्रुवारी, २०२३ रोजी दुपारी ३.०० वाजल्यापासून school login मध्ये download करण्याकरिता उपलब्ध होतील.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad