११ ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२५-२०२६ | 11 Online Admission Process 2025-2026
इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश राज्यातील मुंबई (MMRDA), पुणे पिंपरी चिंचवड, अमरावती, नागपूर आणि नाशिक या महानगरपालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयात राबविण्यात येत आहेत. सदर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची उपयोगीता व व्यवहार्यता लक्षात घेवून तसेच मा. मुख्यमंत्री महोदयांच्या सात कलमी कृती उद्दिष्टांमध्ये असलेल्या EASE OF LIVING या उद्दिष्टान्वये विद्यार्थी व पालकांचे जीवनमान सुखकर बनविणे व याकामी खर्च होणारा वेळ, पैसा व श्रम याचा अपव्यव टाळण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पासून इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पध्दती राज्यभर राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार पुढीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.
![]() |
११ ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२५-२०२६ |
११ ऑनलाईन प्रवेश(toc)
सन २००९-२०१० या शैक्षणिक वर्षापासून मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील मुंबई महानगर विकास प्राधिकरण (MMRDA) क्षेत्रातील सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता ११ वीचे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत संदर्भाधिन क्रमांक २ येथील दि. २८.०५.२००९ च्या शासन निर्णयान्वये आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. सदर आदेशामध्ये संदर्भाधिन क्रमांक ३ व ४ येथील शासन निर्णयान्वये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत.
११ ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२५-२०२६ 11 Online Admission Process 2025-2026
त्याचप्रमाणे संदर्भाधिन क्रमांक ५ येथील दि. ०३.०३.२०१४ च्या शासन पत्रान्वये सन २०१४-१५ या शैक्षणिक वर्षापासून पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पध्दतीने करण्याबाबत शासनाने मान्यता दिलेली आहे. मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी १२७/२०१४ या जनहित याचिका प्रकरणी दि.०५.०८.२०१५ रोजी दिलेल्या निर्देशानुसार इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रक्रीयेबाबत सन २०१६-१७ साठी धोरणनिश्चित करून प्रवेश प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्याच्यादृष्टीने संदर्भ क्रमांक ९ येथील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
११ वी ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुधारित कार्यपद्धती
मुंबई (MMRDA), पुणे, पिंपरी-चिंचवड, अमरावती, नागपूर आणि नाशिक या महानगरपालिका सोबतच इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पध्दती राज्यभर राबविण्याबाबत शासन मान्यता देण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पासून महाराष्ट्र राज्य क्षेत्रातील सर्व मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पध्दतीने करण्याबाबत खालीलप्रमाणे सुधारित कार्यपध्दती अवलंबिण्यात यावी :-
१) इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्र (MMRDA), पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती, नाशिक महानगरपालिका क्षेत्रासोबतच सन २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र राज्य क्षेत्रातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा /कनिष्ठ महाविद्यालयांना लागू राहील.
२) विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद, लातूर व कोल्हापूर हे उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून नोंदणी अर्जामध्ये नमूद केलेली माहिती उदा. शाखानिहाय तुकड्या, अनुदानित, विना-अनुदानित, कायम विना-अनुदानित (स्वयंअर्थसहाय्यित) वर्गनिहाय व शाखानिहाय विद्यार्थी प्रवेश क्षमता, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये उपलब्ध असलेले विषय इत्यादी तपासून शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी निश्चित केलेल्या ऑनलाईन सेवा पुरवठादारास विहित कालावधीत उपलब्ध करुन देतील.
३) शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पासून इयत्ता ११ वी केंद्रिय ऑनलाईन प्रवेश प्रकीया राज्यस्तरावर राबविण्यासाठी आयुक्त (शिक्षण), पुणे यांनी नियंत्रण ठेवावे व या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेची अंमलबजावणी शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांच्या स्तरावर करण्यात यावी.
११ प्रवेश ऑनलाईन प्रक्रिया संपूर्ण राज्यभर होणार शासन निर्णय pdf ⬇️
11 Online Admission Process 2025-2026
४) राज्यस्तरावर ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टिने विद्यार्थी व पालकांना प्रवेश पध्दती विषयी माहीती उपलब्ध करुन द्यावी. व आवश्यकता असल्यास याविषयी प्रशिक्षणासाठी व्हिडिओ उपलब्ध करून द्यावे.
५) इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राज्यस्तरावर राबविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविणे व अन्य पुर्वतयारी शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांच्या स्तरावर करण्यात यावी.
६) नियमित चार फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर इयत्ता अकरावीचे वर्ग सुरू करण्यात यावेत. तद्नंतर इयत्ता ११ वी चे प्रवेश उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर सर्वांसाठी खुले (OPEN TO ALL) ठेवावेत व सदरचे प्रवेश गुणवत्तेच्या आधारावर करण्यात यावेत. याबाबतचे आदेश संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात यावेत.
७) इ.११ वी मध्ये प्रवेशित होणाऱ्या शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीनेच होईल.
८) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राज्यस्तरावर राबविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सुचना त्यांच्या स्तरावरुन निर्गमित कराव्यात.