गुरुपौर्णिमा मराठी भाषण २०२५ Guru Purnima Marathi Speech2025
नमस्कार आदरणीय मुख्याध्यापक शिक्षक गण पालक वर्ग आणि माझा प्रिय मित्र-मैत्रिणींनो
आज आपण येथे एकत्र आलो आहोत एक अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायी सन गुरुपौर्णिमा साजरा करण्यासाठी.
"गुरु" या शब्दाचा अर्थ खूप गहन आहे.
गुरु म्हणजे जे अज्ञानाचा अंदाज दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतात.
"गुरु” आपल्याला शिकवतात ,घडवतात आणि चांगला माणूस बनवतात. आई-वडिलांनंतर गृहीत आपली खरी संपत्ती आहे या दिवशी आपण आपल्या गुरुजनांचा आभार मानतो . त्यांच्या मार्गदर्शनासाठी त्यांना वंदन करतो.
ही परंपरा आपल्या महर्षी व्यास यांच्या काळापासून आहे. महाभारताचे लेखक वेदांची विभाग करणारे व्यास यांचा जन्मदिवस आणि या दिवशी त्यांना आदरांजली वाहून आपण सर्व गुरूंना वंदन करतो.
आजच्या डिजिटल युगात माहिती सहज मिळते पण खरी शिक्षणाची मूल्य, संस्कार आणि ज्ञान हे गुरु देऊ शकतात.
शाळेतील शिक्षक, घरातले पालक ,आणि आयुष्यभर भेटणारे मार्गदर्शक हे सगळेच आपले गुरु असतात.
चला, या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण एक संकल्प करूया आपल्या गुरूंचा आदर करून त्यांच्या शिकवणी प्रमाणे वागू आणि सदैव ज्ञानाचा सदगुणांचा मार्ग धरू.
शेवटी एक छोटीशी ओळ सांगतो
गुरु बिना ज्ञान नाही, ज्ञान बिना जीवन नाही.
आपल्या सर्व गुरुजनांना माझे शतशः वंदन!
जय हिंदी जय महाराष्ट्र 🚩