Type Here to Get Search Results !

10वी एस एस सी मार्च 2024 हॉल तिकीट कसे डाऊनलोड करावे | How to Download 10th SSC March 2024 Hall Ticket

 10वी एस एस सी मार्च 2024 हॉल तिकीट कसे डाऊनलोड करावे How to Download 10th SSC March 2024 Hall Ticket


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना सूचित करण्यात येते की, माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा मार्च २०२४ साठी सर्व विभागीय मंडळातील विद्याथ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध करून देण्यात येत आहेत. 

How to Download 10th SSC March 2024 Hall Ticket
10वी एस एस सी मार्च 2024 हॉल तिकीट


10वी एस एस सी मार्च 2024 हॉल तिकीट कसे डाऊनलोड करावे How to Download 10th SSC March 2024 Hall Ticket

सर्व माध्यमिक शाळांना मार्च २०१४ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेची प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर बुधवार दि. ३१ जानेवारी, २०२४ पासून school login मध्ये download करण्याकरिता उपलब्ध होतील, या संदर्भात काही तांत्रिक अडचण उ‌द्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, ऑनलाईन प्रवेशपत्रे (Hall Ticket) उपलब्ध करून घेण्याच्या अनुषंगाने सूचित करण्यात येते की,

How to Download 10th SSC March 2024 Hall Ticket


१. मार्च २०२४ मधील इ. १० वी परीक्षेसाठीसाठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांनी इ. १० वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत.

२ . प्रवेशपत्र (Hall Ticket) उघडताना (Open) काही त्रुटी (Error) आल्यास सदर प्रवेशपत्र Google Chrome मध्ये उघडावे.

३. प्रवेशपत्र (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने प्रिंट करून देताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी,

४. प्रवेशपत्रामध्ये (Hall Ticket) विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुसत्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यावयाच्या आहेत.
५. प्रवेशपत्रावरील (Hall Ticket) फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख व जन्मस्थळ या संदर्भातील दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवावयाची आहे.

६. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे.

७. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुनःश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत (Duplicate) असा शेरा देऊन विद्याच्याँस प्रवेशपत्र द्यावयाचे आहे. तरी मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणा-या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी

प्रविष्ठ झालेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक तसेच सर्व माध्यमिक शाळा यांनी उपरोक्त बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करावी.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad