Type Here to Get Search Results !

अकरावी FYJC 11 वी महाराष्ट्र ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२५ -२०२६ वेळापत्रक संपूर्ण माहिती | 11th FYJC 11th Maharashtra Online Admission Process 2025-2026 Timetable Complete Information

 अकरावी FYJC 11 वी महाराष्ट्र ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२५ -२०२६ वेळापत्रक संपूर्ण माहिती  11th FYJC 11th Maharashtra Online Admission Process 2025-2026 Timetable Complete Information 

नमस्कार  विद्यार्थी मित्रांनो दोन दिवसापूर्वी बारावीचा निकाल लागला. आता आतुरता आहे ती दहावीच्या निकालाची. येणाऱ्या 15 मे पर्यंत दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. दहावीचा निकाल लागला की लगेच आपली धावपळ सुरू होते ती अकरावी FYJC 11 वी महाराष्ट्र ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२५ -२०२६ ची ही  धावपळ होऊ नये म्हणून आपल्या साठी 11th FYJC 11th Maharashtra Online Admission Process 2025-2026 Timetable Complete Information माहिती देणार आहे.

अकरावी FYJC 11 वी महाराष्ट्र ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२५ -२०२६ वेळापत्रक संपूर्ण माहिती
अकरावी प्रवेश प्रक्रिया FYJC 



अकरावीची प्रवेश प्रक्रिया 2025-2026(toc)

अकरावीची प्रवेश प्रक्रिया यापूर्वी मुंबई, पुणे व पिंपरी - चिंचवड, अमरावती महानगरपालिका, नागपूर महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका आणि छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका या सहा महानगरपालिका क्षेत्रांमध्ये ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत होती. मात्र प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता, पारदर्शकता आणि गैरप्रकाराला आळा बसावा यासाठी संपूर्ण राज्यामध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून ऑनलाईन पद्धतीने राबविण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. 

अकरावी FYJC 11 वी महाराष्ट्र ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२५ -२०२६

दहावीच्या  निकालानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू होते त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत दिनांक 19 ते 28 मे पर्यंत करता येणार आहे त्यानंतर राज्यभरातील शासनाने निर्धारित केलेल्या अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून महाविद्यालय निवडण्याची मुभा देण्यात येणार आहे.

11th FYJC 11th Maharashtra Online Admission Process 2025-2026 Timetable Complete Information


१.शाळा महाविद्यालयांची माहिती संकेतस्थळावर भरणे व अद्यावत करण्यासाठी दिनांक ८ ते १५  मे अशी मदत देण्यात आले आहे.

२.विभागीय शिक्षण व संचालक व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी उच्च माध्यमिक च्या शाखांची माहिती प्रमाणित करण्यासाठी दिनांक ८ ते १६ मे असा कालावधी देण्यात आला आहे.

३.विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रोफाइल तयार करण्यासाठी १९  ते २८ मे हा कालावधी देण्यात आला आहे .

४. विद्यार्थ्यांना १९ ते २८ मे या कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयाचे  प्राधान्यक्रम भरता येणार आहे.

अकरावी FYJC 11 वी महाराष्ट्र ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२५ -२०२६ फेरी 

 प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी पुढील फेऱ्या होणार आहेत.
 शून्य फेरी- 
 व्यवस्थापन कोटा-
अल्पसंख्याक व इन हाऊस कोटा   - अल्पसंख्याक व इन हाऊस कोटा कोट्यातील प्रवेश निश्चित करता येणार आहे. 

अकरावी FYJC 11 वी महाराष्ट्र ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२५ -२०२६ कॉलेज कधी सुरू होणार?

प्रवेश फेरीचे वेळापत्रक टप्प्याटप्प्याने जाहीर होणार आहे सर्व प्रवेश फेरीची प्रक्रिया पूर्ण झाल्या नंतर अकरावीचे वर्ग ११ ऑगस्ट पासून सुरू करण्यात येणार आहेत.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad