Type Here to Get Search Results !

आधनिक भारतातील सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले द्विजन्मशताब्दी वर्ष | The Bicentenary Year of Mahatma Jyotiba Phule—Pioneer of the Social Revolution in Modern India and Great Social Reformer.

आधनिक भारतातील सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, थोर समाजसेवक महात्मा  ज्योतिबा फुले द्विजन्मशताब्दी वर्ष | The Bicentenary Year of Mahatma Jyotiba Phule—Pioneer of the Social Revolution in Modern India and Great Social Reformer.

 महात्मा जोतीराव फुले हे आधनिक भारतातील सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, थोर समाजसेवक, शिक्षणतज्ञ व मानवी मूल्यांचे पुरस्कर्ते होते. त्यांनी 19 व्या शतकात जातीय विषमता, अंधथध्दा आणि शिक्षणावरील बंदी याविरोधात निर्भयपणे लढा दिला. सत्यशोधक समाजाची स्थापना करुन त्यांनी समतेचा, सामाजिक न्यायाचा आणि मानवमुक्तीचा विचार सर्व सामान्यांपर्यंत पोहोचवला.

स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे प्रत्यक्ष कृतीतून दाखवूनदिले. वंचित, शोषित समाजासाठी शिक्षण, प्रतिष्ठा आणि समानतेसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यामुळेचे महात्मा फुले यांचे विचार आजही संविधानिक मूल्ये, सामाजिक समता आणि समतेवर आधारित लोकशाहीसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरतात.

महात्मा फुले यांच्या जयंतीला सुन 2027 मध्ये 200 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने मा. मुख्यमंत्री महोदयांनी महात्मा जोतिराव फुले यांचे सन 2027 हे द्विजन्मशताब्दी वर्षे साजरे करण्यासंदर्भात सन 2026 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषणा केलेली आहे. यानुसार सन 2027 मध्ये महात्मा जोतिराव फुले यांचे द्विजन्मशताब्दी वर्षे साजरे करण्यासाठी राबवायच्या उपक्रमासाठी शासन निर्णय दि. 10 मार्च, 2026 अन्वये समिती गठीत करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत महात्मा जोतीराव फुले यांचे दि.11 एप्रिल 2026 ते दि.10 एप्रिल, 2027 या कालावधीत विविध उपक्रम, कार्यक्रम साजरे करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad